Sunday, January 5, 2014

" लहान मुले म्हणजे बागेतील फुलांचा चौफेर अस्वाद घेणारे फुलपाखरं" अशा या फुलपाखरांना बंद खोलीत भिंतीच्या आवारात शिक्षण दिले तर त्यांच्या काही पचणी पडणार नाही आणि विशेष म्हणजे त्यांच मन ही रमणार नाही.
   अशा फुलपाखरांचं मन रमण्यासाठी ........ कुठेतरी डोंगराच्या विस्तीर्ण रांगेत, सुर्यालाही लवकर पोहचता येता येणार नाही इतक्या उंच  हिमालयासारख्या पर्वत रांगा आणि खोल असलेल्या दऱ्या, डोंगरावरूण वाहणाऱ्या उताराच्या खळखळ नद्या, किलबीलाट करूण कान मंत्रमुग्ध करणारे पक्षी, इकडून तीकडे सारखी सैरा-वैरा उडणारी फुलपाखरे आणि डोक्यावरूण मायेची हात फिरवून छाया देणारे झाडे यांच्या सानिध्यात असणारी माझी सुंदर स्वप्नातील शाळा किती गोड असेल ना?
या बिना घंटीच्या शाळेत विद्यार्थ्यांना अभ्यासाचे बंधन नाही.नाही खेळाचे. अभ्यास करावा वाटत असेल तर  तोही खेळासारखा फुलपाखरांच्या सोबत खेळताना.  
      शाळा म्हणजे विद्यामंदिर या विद्यामंदीरातील देव  विद्यार्थ्यी. माझ्या शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षकांपेक्षा जास्त महत्व असेल. विद्यामंदिराच्या  वर्ग खोल्यांची रचना ही अगदी सहज परंतु तितकीच आकर्षक असेल आणि या वर्गामधील वातावरण हे मंदीरासारखेच प्रसन्न आणि रमणिय असेल. मुख्याध्याप हा शाळेचा कणा असतो. मुख्याध्यापक अगदी बसल्या ठिकाणी सर्व वर्गावर नजर ठेवू शकतील असे त्यांचे कार्यालय असेल. म्हणजे विद्यामंदीराची रचना ही E आकाराची असेल. मुलांना वाचनासाठी, त्यांच्या विचारामध्ये छान अशी भर पडण्यासाठी सुसज्ज वाचनालय, जगातील ज्ञान,घडामोडी क्षणात माहिती करूण घेण्यासाठी संगणक-इंटरनेट, एक प्रशस्त प्रयोगशाळा आणि सर्व सोयी सुविधा माझ्या विद्यामंदिरात असतील.
        असे हे माझे विद्यामंदिर जगात सर्वात सुंदर मंदिर असेल.

6 comments:

Popular Posts

Blogger templates

Blogroll

Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

About

Blogger Tips and TricksLatest Tips And TricksBlogger Tricks
a. Powered by Blogger.

My Blog List

Book Now

Copyright © स्वप्नातील शाळा | Powered by Blogger
Design by Viva Themes | Blogger Theme by NewBloggerThemes.com